सॉक्रेटीसीय संवाद (पूर्वार्ध)
प्रास्ताविक अनुवादक : प्र. ब. कुळकर्णी पुढे दिलेला संवाद प्लेटोच्या प्रसिद्ध संवादांपैकी एक आहे. प्लेटोच्या बहुतेक संवादांत प्रमुख पात्र त्याच्या गुरूचे सॉक्रेटिसाचे आहे. सॉक्रेटिसाने स्वतः काही लिहिलेले दिसत नाही. परंतु सबंध आयुष्य त्याने तत्कालीन तत्त्वज्ञ आणि सामान्य माणसे यांच्याशी चर्चा करण्यात व्यतीत केले, आणि या चर्चेतून तत्त्वज्ञानाच्या इतिहासाला एक वेगळे वळण लावले. त्याच्या वादपद्धतीचा एक …